काटी , दि . १५
तुळजापुर तालुक्यातील सांगवी ( काटी ) येथील निवृत मुख्याधापक मोहन नारायण जोशी यांचे गुरूवारी दुपारी निधन झाले. मृत्युसमयी ते ६८ वर्षाचे होते. मोहन जोशी हे गेले दोन महीन्यापासून आजारी असल्याने त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर पश्चात पत्नी, एक मुलगा तीन मुली, सुन, जावाई असा परिवार आहे. मयत मोहन जोशी हे पचांग जोतिष्यकार म्हणून उस्मानाबाद जिल्हयात त्यांची ओळख होती.