नळदुर्ग , दि . १६

तुळजापूर तालुक्यातील येडोळा व रामतीर्थ येथे एसबीआय फौंडेशन मुबंई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या समन्वयाने ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत जागतिक युवक दिनानिमित्त भारतीय स्टेट बँक स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद यांच्या मार्फत विविध  लघु उद्योगाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. 

यावेळी  आरएसईटीआयचे प्रकल्प अधिकारी विकास गोपणे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास दिलासाचे विलास राठोड, गुरुदेव राठोड, भूषण पवार, श्रीमंत राठोड, महादेव राठोड , येडोळाच्या उपसरपंच लक्ष्मी जाधव, रामतीर्थचे सरपंच बालाजी राठोड व दोन्ही गावातील युवक , ग्रामस्थ  उपस्थित होते.
 
Top