ताज्या घडामोडी


वागदरी , दि . १६ : एस.के.गायकवाड:


महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटाविणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील जवाहर विद्यालय अणदूर येथे लाँकडाऊन शिथिल केल्यानंतर शासन निर्णयाच्या आधिन राहून इयत्ता  ८ वी  ते १२ वी वर्गात शिक्षण घेणा-या  विद्यार्थ्यांची शाळा  करण्यात आली असून शाळेची पहीली घंटा वाजताच मोठ्या प्रमाणात  विद्यार्थी व पालकानी उत्साहात शाळेला हजेरी लावली.

संसर्गजन्य   कोरोना विषाणूच्या महामारीचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदीसह लाँकडाऊन लागू केल्याने गेल्या दिड वर्षा पासून शाळा बंद ठेवण्यात आली होती.
  दि.१५ जुलै  २०२१ रोजी संबंधित ग्राम पंचायतने नाहरकत दिल्याने शासनाचे सर्व नियमाचे पालन करीत एक दिवसा ५० टक्के  विद्यार्थी याप्रमाणे शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाला प्रतिसाद जवळपास आडीचशे विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सुरेश ठोबंरे यांनी गुलाब पुष्प देवून स्वागत केले.
 
Top