वागदरी दि . १६ :
श्रावण बाळ वृध्दापकाळ अर्थसहाय्य योजना ,संजय गांधी अपंग, निराधार अर्थसहाय्य योजने अंतर्गत मानधन मिळण्यासाठी यापूर्वी निवड झालेल्या लाभार्थ्यांना २१ हजार रूपये वार्षिक उत्पन्नाचे प्रमाण पत्र सादर करण्याची घातलेली जाचक अट रद्द करण्यात यावी, या योजनेतील सर्व मंजूर लाभार्थ्यांना पूर्ववत मानधन वाटप करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) च्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, शहराध्यक्ष अरुण कदम,युवा आघाडी शहराध्यक्ष अमोल कदम, अनिकेत सोनवणे, आदीसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.