उस्मानाबाद , दि . १६
खामसवाडी तालुका कळंब येथील दलितांची घरे जेसीबीव्दारे उध्वस्त करणाऱ्या गावगुंडास अटक करुन 19 लोकांची घरे घरकुल योजने अंतर्गत त्वरित बांधून आहे त्या ठिकाणीच पुनर्वसन करण्याची मागणी अन्यायग्रस्त कुटुंबीयांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे शुक्रवार दि. 16 जुलै रोजी निवेदनाव्दारे केली आहे.
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील गायरान जागेवर गावठाण विस्तारित जमिनीवर दि. 13 जुलै रोजी 19 दलित भटक्या विमुक्त जातीची, ओ.बी.सी. ची घरे गेल्या 15 ते 16 वर्षापासुन राहत आहेत. मात्र ग्रामपंचायतीने कसलीही सुचना किंवा नोटीस न देता 19 कुटुंब ची घरे जेसीबीने उध्वस्त केले. यामध्ये संसार उपयोगी भांडी व साहित्य धान्य उध्वस्त झाले. यासंदर्भात आरपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी यांना त्या जागेवर 19 कुटुंबाचे पुनर्वसन करून घरकुल बांधून देण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे, शहर उपाध्यक्ष योगेश बनसोडे, सनी धावरे, खामसवाडी येथील मानिक रणदिवे, मनोहर गंभिरे, अनिल अभिमान सावंत, छाया माळी, दिपक भिमराव माळी यांच्यासह 16 अन्यायग्रस्तांच्या सह्या आहेत.