तुळजापूर , दि . १६ :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजरा होणार्या प्रेरणा दिनाच्या निमित्ताने तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षक सेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक संस्थांमध्ये वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम शिक्षक सेनेने राज्यभर जाहीर केला आहे. त्यानुसार तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षक सेनेच्या वतीने संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण संपन्न झाले .
याप्रसंगी प्राचार्य डॉ. अनिल शित्रे, शिक्षक सेनेचे मराठवाडा अध्यक्ष व राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे, उपप्राचार्य डॉ. एन. बी. जाधव, सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार खेंदाड, डॉ. सौ. आशा बिडकर, एन एस एस प्रमुख डॉ. एस. एस. मोरे, प्रा. जी. व्ही. पाटील, प्रा.अनिल पाटील, प्रा. ए. टी. कदम, प्रा.पांडुरंग शिवशरण प्रा. विवेकानंद कुंभार, अधीक्षक पांडुरंग नागणे, प्रा. रामलिंग थोरात, प्रा. ए. जे. माने, डॉ. सतीश महामुनी, डॉ. शिवाजी जेटीथोर, प्रा. मंदार गायकवाड प्रा. एम. जी. देशमुख, डॉ. अशोक मरडे , प्रा. सौ. सी एस काठेवाड, प्रा. सौ. कोरेकर यांची उपस्थिती होती.
शिक्षक सेनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी संघटनेच्यावतीने संदेश दिला जात आहे. शिक्षक सेनेचे या उपक्रमाचे प्रमुख अतिथी उल्हास बोरगावकर यांनी कौतुक केले.