नळदुर्ग , दि . २५
येथिल जुने ऐतिहासिक खंडोबा मंदिराची वास्तु जोपासणे हे महत्वपुर्ण काम सुरु आसुन या कार्यात शहरातील सर्व नागरीकांचा सहभाग आवश्यक आहे. यातुनच हे मंदिर कार्य होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात आला नाही तर या वर्षीही गणेशोत्सव होईल कि नाही याची शाश्वती नाही. परंतु या उत्सवासाठी जो निधी मंडळाकडे जमा होतो तो सत्कारणी लागावा, या उदात्त हेतुने न्यु चैतन्य तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडळाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली.
गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव गेल्या वर्षासारखाच होणार आहे तर मग गणेशोत्सवाचा जमा निधी विधायक कार्यास लागावा , यासाठी तिनशे ते चारशे वर्षानंतर प्रथमच होत असलेल्या आपल्या ग्रामदैवत खंडोबा मंदिराचा जिर्णोध्दार कार्यास हातभार लावन्याचा निर्णय मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतला व स्वयंस्फूर्तीने १३ हजार ५११ रुपयांचा निधी जमा करून खंडोबा जिर्णोध्दार कार्यासाठी सुपुर्द केला.
न्यु चैतन्य तरुण गणेश मंडळाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आसुन या मुळे खंडोबा मंदिर जिर्णोध्दारास अत्यंत महत्वपुर्ण मदत मिळाली आहे.
त्यांच्या या कार्यामुळे ऐतिहासिक वास्तुचे जतन व संवर्धन होणार आहे. मंडळाचे कार्यकर्त्ये केवळ आर्थिक मदतच करीत नसुन प्रत्येकास त्यांच्या कामाव्यतीरीक्त फुरसत मिळेल तसे मंदिर परीसरात येवुन श्रमदान ही करीत आहेत. या मंडळा प्रमाणेच शहरातील प्रत्येक गणेश मंडळाने जिर्णोध्दार कार्यासाठी पुढे यावे व जिर्णोध्दार कार्यात सहभागी व्हावे असे अवाहन केल्याने मंडळाचे आधारस्तंभ शरद बागल, अमित शेंडगे, कैलास घाटे, गणेश शेंडगे, नारायण दोपारे तसेच सुशांत भूमकर, रमेश जाधव, अशोक चव्हाण, संजय वेदपाठक, धिमाजी घुगे, अभिजित लाटे, शशिकांत चौधरी आदी उपस्थित होते.