काटी , दि . २६ :
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पंचायत समिती गणाचे पं.स.सदस्य तथा राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक दत्तात्रय शिंदे यांची तुळजापूर पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल काटी येथील महात्मा फुले ग्रुपच्या वतीने मान्यवरांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आले.
शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात येऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मारूती रोकडे,काटीचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भाले, नवनाथ सुरडकर, मोहन हागरे, बालाजी ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.