लोहारा , दि . १०
लोहारा शहरातील सफाई कामगाराचे वेतन गुत्तेदार कमी देत असल्याच्या कारनावरुन संतप्त सफाई कामगार महिला पुरुषांनी ठिय्या आदोंलन करीत पगार वाढ देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या घातला.
लोहारा शहरात नगर पंचायत मार्फत ठेकेदाराला शहरातील घण कचऱ्यासह स्वच्छता करण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाकडून ठेका दिला आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापन करणे, शहर स्वच्छ ठेवणे आदी कामे सफाई कामगारांकडून केले जाते .
कोरोनाच्या महामारीत देखील सफाई कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले आहेत. परंतु शहरातील स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगारांचे वेतन वाढ मागणी ठेकेदार पूर्ण करीत नसल्यामुळे शहरातील सफाई कामगारांनी स्वच्छता कामे बंद केले होते. तर ठेकेदाराला अधिक वेतन देणे परवडत नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठेकेदार व सफाई कामगार यांच्यात वाद करीत सफाई कामगारांनी ठिय्या घातला होता.
या ठिय्या प्रसंगी ठेकेदाराने ईतर शहरातील सफाई कामगार आणल्यामुळे शहरातील सफाई कामगार व नगरसेवक यांनी ठेकेदारावर रोष व्यक्त करीत शहरातील सफाई कामगारांनाच वेतन वाढ देऊन आठ तास काम न करता चार तास काम करण्यासाठी सांगण्यात आले व कामावर घेण्यासाठी भाग पाडले. स्वच्छता ठेकेदाराला नगर पंचायत प्रशासनाकडून निधी कमी झाल्याने ठेकेदाराने आठ तासा ऐवजी चार तासांवर कामगारांना कामावर ठेवण्यात आले. परंतु सफाई कामगारांना वेतन कमी दिले जाते व वेतनवाढ करून द्यावे, या मागणीसाठी सफाई कामगारांनी काम बंद करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या घातला होता.
सदर प्रकार व सफाई कामगारांचे रोष वाढत असल्याने चार तास कामावर सफाई कामगारांनी काम करावे यांसह सफाई कामगारांच्या मागणी प्रमाणे सदर प्रकरण मिटवण्यात आले.
यावेळी लोहारा पोलिसांनी वेळीच येऊन सदर प्रकार थांबविला. या प्रसंगी माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, शाम नारायणकर,अभिमान खराडे, आरिफ खानापुरे,पोलीस ठाण्याचे विजय कोळी, सदाशिव पांचाळ, गोरोबा इंगळे, अविनाश जाधव, दत्तात्रय झिंगाडे,व ग्रामस्थ मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.