उस्मानाबाद ,दि . १०
पोलीस ठाणे नळदुर्ग जळकोट ता . तुळजापूर येथील प्रफुल्ल कारले यांना बायो डिझेल खरेदी करायचे असल्याने त्यांनी ऑनलाईन शोध घेउन गुजरात राज्यातील नागेशकुमार कटारीया यांच्याशी दिनांक 05-07 जुलै दरम्यान अनेकदा संपर्क साधला. यावेळी कटारिया यांनी 24,000 लिटर बायो डिझेल खरेदी पोटी 6,30,000 रुपये अग्रीम रक्कम मागितल्याने कारले यांनी कटारीया यांनी सांगितलेल्या खात्यात ती रक्कम ऑनलाईन पध्दतीने भरली.
परंतु कटारीया यांनी कारले यांना बायो डिझेल पाठवले नाही व रक्कमही परत केली नाही.अशा मजकुराच्या कराले यांनी दिले प्रथम खबरे वरुन भादसं कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.