मुरुम, दि . १० : 

भिमनगर भागातील माजी मुख्याध्यापक तथा माजी नगराध्यक्ष जे.टी.लिमये गुरुजी यांचे शनिवारी दि .१० रोजी सकाळी सात वाजता अल्पशा: आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते कोथळी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ.नरसिंग कदम यांचे ते सासरे होते.
 
Top