तुळजापूर , दि . १० : राजगुरु साखरे
मागील पंधरा दिवसापासून जिल्हासह तालुक्यात दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी दि.१० रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक ते दोन तास जोरदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हा पाऊस ,पिकवाढीस मदत होणार आहे. या पावसामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद जणू ओसंडून वाहत आहे. खरीप हंगामात घेतले जाणारे सोयाबीन , उडीद, मुग, तुर, आदी पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांना योग्य वेळेस पाऊस झाल्यामुळे पिकांना टवटवीतपणा आला आहे. यावषी मान्सुनपुर्व पाऊस वेळेत झाल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी आटोपुन घेतली . मात्र पीक उगवून आल्यानंतर पावसाने ओढ दिली. त्यात उन्हाची तीव्रता हळूहळू वाढत होती. त्यात पिके करपू लागली होती. तसेच करपणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच खुरपणी कोळपणीच्या कामाला गती येत असल्याचे चित्र दिसून येत आहे .