नळदुर्ग , दि . १०

तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील शेतकऱ्याच्या शेतरस्ता आडविलेला रस्त्याचा प्रश्न अखेर नळदुर्ग महसूल मंडळ अधिकारी अमर गांधले  यांच्या प्रयत्नाने  शुक्रवार दि. ९  जून रोजी मोकळा झाला आहे.  कित्येक वर्षापासून प्रलंबीत पडलेला हा शेतरस्ता मंडळ अधिकारी यांनी अर्जाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दुर केली.


 शेतकरी दगडु शरणाप्पा मुळे व इतर शेतकऱ्यांच्या  अर्जाची दखल घेत स्थळ पाहणी करून शेत रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात  आले आहे.
कित्येक वर्षे  गट न 513 मधील शेतकऱ्यांना  जाण्या - येण्यासाठी रस्त्याची गैरसोय होत होती. अडचण निर्माण होवुन अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत होते.  त्यामुळे येथील शेतक-यांनी  तहसीलदार तुळजापूर यांच्याकडे अर्ज दाखल करून अडविलेला रस्ता खुला करून देण्याची मागणी केली .  या अर्जाची दखल घेत तहसीलदार यांच्या निर्देशनुसार नळदुर्ग महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी अमर  गांधले  व होर्टी सज्जाचे तलाठी  गणेश जगताप, पोलीस पाटील भागवत भाळशंकर, सरपंच संजय गुंजिटे, यांनी स्थळ पाहणी केली. व शेतरस्ता मोकळा करून दिला.


 यावेळी शेतकरी गिरी तुगावे ,  विरणाथ मुळे, शंकर मुळे, भीमा मुळे, अशोक मुळे, सूर्यकांत मुळे, शरानु मुळे, लक्ष्मण मुळे, गंगाधर मुळे, शिवलिंग टिकांबरे,दिलीप खोत आदिजन उपस्थित होते.

 
Top