पोलीस ठाणे तामलवाडी :  सुरतगाव येथील ज्ञानराज गुंड व  लक्ष्मी दादासाहेब घोडके या दोन्ही कुटुंबीयांचा दिनांक 07 जुलै रोजी 16.30 वा  गावात वाद-विवाद झाला. यात दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर विरोधी कुटुंबीयांस शिवीगाळ करुन व ठार मारण्याची धमकी  देवुन लाथा बुक्यांनी , काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी दिलेल्या दोन प्रथम खबरेवरुन  भादसं कलम 143, 147, 148, 149, 326, 323, 504, 506 अन्वये गुन्हे नोदंविण्यात आले आहेत.

 

पोलीस ठाणे ढोकी:  सारोळा (भि) येथील ज्ञानदेव कांबळे हे  दिनांक 08 जुलै रोजी 09.00 वा घरासमोर उभे होते. यावेळी भाउबंद महानंदा व मनोहर कांबळे यांनी ज्ञानदेव यांना  जुन्या वादातुन शिवीगाळ करुन काठीने मारहाण सुरु केली. ज्ञानदेव यांच्या बचावास  त्यांची पत्नी शिवगंगा व सुन प्रेरणा या दोघी पुढे आल्या असता नमुद दोघांनी त्यांनाही मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या ज्ञानदेव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  भादसं कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोदंविला आले.

 

पोलीस ठाणे उमरगा: उमरगा शहरात मासे विक्री  करणा-या दत्ता सोनकवडे यांना  दिनांक 08 जुलै  रोजी जयदीप सोनवकडे व तानाजी चौगुले  यांनी आडवुन “तुझ्या मासे विक्रीमुळे माझा मासेविक्रीचा धंदा मंदावला आहे. तु येथे धंदा करु नकोस.” असे धमकावुन व शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी मारहाण करुन  ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकराच्या दत्ता सोनकवडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  भादसं कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोदंविला आले.

 
Top