किलज , दि .७

 
अखिल भारतीय तैलिक शाहू महासभा नवी दिल्ली यांचे राष्ट्रीय अध्यक्ष. जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार उस्मानाबाद जिल्हा तेली समाज अध्यक्ष तथा अखिल भारतीय तैलिक शाहू महासभा युवक प्रदेश उपाध्यक्ष रवी कोरे आळणीकर ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महादेव मेंगले, उस्मानाबाद जिल्हा युवक अध्यक्ष शशिकांत बेगमपुरे यांनी आज दि.७ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा आणि तुळजापूर या तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबाच्या गावामध्ये दौरा केला.


यामध्ये तुळजापूर तालुक्यातील किलज येथील तेली समाजातील कोरोनामुळे मृत्य पावलेले विश्वनाथ दळवी आणि शांताबाई दळवी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन असे तेली समाज जिल्हाध्यक्ष. रवी कोरे यांनी  सांगितले. 

यावेळी लोहारा तालुकाध्यक्ष. भीमाशंकर डोडके, बसवंत बंगले, विजय जवादे, प्रमोद बंगले, सुनील ठेले, सुनील देशमाने , बसवराज जवादे, गोविंद बंगले, अनिल ठेलेसह किलज येथील दळवी कुटुंबीय उपस्थित होते.
 
Top