उस्मानाबाद , दि . ७ : 
राजुरी ता उस्मानाबाद  येथे लोक सहभागातून, गावपातळीवर सुरू झालेल्या जिल्हयातील पहिल्या अत्याधुनिक कम्युनिटी आयसोलेशन सेंटरचे उदघाटन सोमवार रोजी करण्यात आले. 

क्लायमेट फंड मॅनेजर या संस्थेच्या मदतीने उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील 10 बेडच्या आयसोलेशन सेंटरचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. 

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन देशमुख, गटशिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, पंचायत समिती सदस्य कुसुमताई इंगळे, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे,स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या नसीम शेख, किरण माने, प्रशांत पाटील, सरपंच मधुकर गळकाटे, पत्रकार महेश पोतदार, उपसरपंच गणेश घोगरे,  ग्रामसेवक अश्विनीकुमार पाटील,  इत्यादि उपस्थित होते.


 कम्युनिटी आयोसलेशनन सेंटर तयार करण्यासाठी गावकऱ्यांनी, ग्रामपंचायत मार्फत लोकसहभागातून यासाठी पुढाकार घेतला आहे. तर स्वयंशिक्षण प्रयोग या सामाजिक संस्थेच्या  सहकार्याने आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे कम्युनिटी आयसोलेशन सेंटर चालवण्यात येणार आहे.

भविष्यात येणाऱ्या कोरोनाच्या अपत्तीवर मात करण्यासाठी, गाव पातळीवरच समुपदेशन  करण्याच्या उद्देशाने हे सेंटर काम करणार आहे. या सेंटर मार्फत प्राथमिक टप्प्यातील कोविड संसर्ग झालेल्या लोकांची या ठिकाणी काळजी घेतली जाणार आहे. होम आयसोलेशनचा सल्ला दिलेल्या रुग्णांना येथे एडमीट करून घेण्यात येणार आहे. तसेच कोविड संसर्ग  रोखण्यासाठीची प्रतिबंधात्मक उपाययोजना, माहिती, लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी समुपदेशन, लसीकरण संबंधित माहिती आणि लसीकरण साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन, तसेच अँटीजन तपासणी ही करण्यात येणार आहे. गावातील जागरूक तरुणांना रुग्णांच्या काळजीबाबतचे प्राथमिक प्रशिक्षण ही येथे देण्यात येणार आहे.


विशेष म्हणजे 10 बेडच्या कम्युनिटी आयोसलेशनन सेंटरसाठी राजुरीच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून  पाणी पुरवठा, दैनंदिन स्वच्छता, रुग्णांना सकस  नाष्टा, चहा, जेवण, वीज पुरवठा, इमारतीमध्ये फॅन, ट्यूब,आनंददाई निवासाची सोय, गरम पाणी ,टॉयलेट-बाथरूम, तसेच अंबुलन्स वाहन उपलब्ध करून दिले आहे.


तसेच स्वयं शिक्षण प्रयोग या सामजिक संस्थेने, क्लायमेट फंड मॅनेजर यांच्या सहकार्याने, 10 बेड, गाद्या, तसेच आधुनिक वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, इन्व्हर्टर, कंप्युटर, प्रिंटर, थर्मा मीटर गन, ऑक्सिमिटर, बीपी मॉनिटर, स्टीमर, टेबल, खुर्च्या, व्हील चेअर  यासारखे रुग्णांना उपयोगी पडणारे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. संस्थेच्या सहकार्याने उस्मानाबाद जिल्हयातील 15 गावात असे आयसोलेशन सेंटर निर्माण करण्यात येणार आहेत . 


गावातील शाळेने 4 वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या शाळेच्या आवारात ग्रामस्थांनी जोपासलेली वनराई असून अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे कम्युनिटी आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
 
Top