काटी , दि. ७ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील युवा नेते सुजित हंगरकर यांची सरपंच परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुस्लिम समाज व मित्रपरिवाराच्या वतीने मावळे गल्लीत शाल, श्रीफळ, फेटा व पुष्पहार घालून यथोचित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी फटक्यांची आतषबाजी करुन व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी सरपंच आदेश कोळी, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, करीम बेग, पत्रकार उमाजी गायकवाड, जितेंद्र गुंड, भैरी काळे, सुहास साळुंके, चंद्रकांत काटे, अहमदखान पठाण, शिवलिंग घाणे, धनाजी गायकवाड, माजिद इनामदार,साजिद इनामदार, कय्युम कुरेशी, सिकंदर कुरेशी, अमीरखान पठाण,अमित हंगरकर, अजित हंगरकर, जुबेर शेख,असिफ बेग, सद्दाम शेख, अकिल इनामदार, बिलाल इनामदार,आजम पठाण,जुबेर शेख,रहीम बेग,फिरोज पठाण,गुड्डू इनामदार,मुस्तफा पठाण आदी जण उपस्थित होते.