तुळजापूर  दि २८ 

राज्यव्यापी आराधी, गोंधळी, वाघ्या, शाहिर, भजनी परिषदेची निलंगा तालुक्यातील नणंद  येथून  तुळजापूरकडे दंडवत यात्रेस सुरुवात झाली असून दि . १ ऑगस्ट  रोजी ही यात्रा तुळजापुरात येणार आहे,   शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूर येथे  राज्यव्यापी आराधी, गोंधळी, वाघ्या, शाहिर, भजनी परिषदेचे १ ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे केले आहे.  


कलावंताच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कलावंताच्या मागण्या मांडण्यासाठी तुळजापूर येथे या कलावंतांना एकत्र केलेले आहे. नणंद ते तुळजापूरपर्यंत २५ जुलै २०२१ ते १ ऑगस्ट २०२१ या दरम्यान, दंडवत यात्रेचा प्रवास असा शिवणी, मोगरगा, २६ जुलै रोजी लामजना, २७ जुलै रोजी तपसे चिंचोली, २८ जुलै रोजी पोमादेवी जवळगा, २९ जुलै रोजी माळकोंडजी, कवळी, वांगजी, ३० जुलै रोजी आशिव, उजनी, ३१ जुलै रोजी पाटोदा, करजखेडा, काक्रंबा, १ ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे समारोप होणार आहे. 


दि .३ ऑगस्ट २०२१ रोजी श्री क्षेत्र नणंद येथे महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती राजेंद्र गायकवाड यांनी दिली आहे. गोंधळी, वाघ्या, राज्यव्यापी आराधी, शाहीर, भजनी परिषद शाहीर, भजनी परिषद असेल, २५ जुलै रोजी नणंद,उद्घाटन अ. भा. गोंधळी समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र वनारसे यांच्या हस्ते झाले आहे.

समारोप राज्यव्यापी आराधी, गोंधळी, वाघ्या, शाहिर, भजनी परिषदेचे प्रांताध्यक्ष राजेंद्र गायकवाड (गोंधळी) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

गोरगरीब कलावंतांना मागील दोन वर्षापासून प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे आजही शासन या कलावंतांना मदत करण्यास कोणतेच निर्णय करीत नसल्याचे दिसून येत असल्यामुळे संघटनेने हा कलावंताचा आवाज शास्त्र पर्यंत पोहोचण्यासाठी सदर दंडवत यात्रेचे आयोजन केल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड गोंधळी यांनी दिली आहे.
 
Top