महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर शहर शिवसेना व युवासेना यांच्या वतीने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना उदंड आयुष्य लाभू दे यासाठी महाआरती करण्यात आली .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसादाचे वाटप करण्यात आले . तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड सेंटर येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित उपशहर प्रमुख बापूसाहेब नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे, दिनेश रसाळ, युवासेना जिल्हा चिटणीस लखन परमेश्वर, युवा सेना तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी, युवा सेना शहर प्रमुख सागर इंगळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, उपतालुका प्रमुख शंकर लोभे, भरत आप्पा जाधव, ग्राहक संरक्षण शहर प्रमुख स्वरुप कांबळे, युवासेना शहर कार्याध्यक्ष प्रदीप इंगळे, अर्जुन साळुंके, लक्ष्मण माळी, दीपक नाईकवाडी, विद्यार्थी सेना शहर प्रमुख ऋषिकेश इंगळे तुळजापूर शहर शिवसैनिक उपस्थित होते