मुरूम, दि. २८  : निसर्गाच्या प्रकोपाने रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्हयात अस्मानी संकट कोसळले आहे. शेतातील उभी पिके, बागा डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्या. शेकडो घराच्या भिंती पडल्या. हजारो लोक बेघर झाले. उद्योग-धंदे बंद पडले. या सर्व पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र पत्रकार संघ, उस्मानाबादकडून माणुसकीचे दर्शन व सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून महाराष्ट्र पत्रकार संघाकडून पूरग्रस्तांना ऑनलाईनद्वारे मंगळवार रोजी १७ हजार रुपयाची रक्कम पाठविण्यात आली आहे. 


पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तू, कपडे, आरोग्य व अन्य बाबी खरेदीसाठी पैशाची गरज असल्याने ती रक्कम तात्काळ जमा करण्यात आली. या परिसरातील अनेकांच्या घरासह शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. गावांचा संपर्क तुटला आहे. लाखो लोकांचा संसार उघड्यावर पडला आहे. आता केवळ त्यांना जगणे महत्वाचे असल्याने अशा लोकांना अन्न, वस्त्र, पाणी व आरोग्यांच्या सुविधा पुरविणे महत्वाचे आहे. 


महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. शिवपुत्र कनाडे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष हुलपल्ले, जिल्हाध्यक्ष डॉ. महेश मोटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, सचिव डॉ. सुधीर पंचगल्ले, सल्लागार प्रा. युसूफ मुल्ला, तालुका कार्याध्यक्ष गुंडू दूधभाते, कोषाध्यक्ष नामदेव भोसले, उमरगा तालुकाध्यक्ष महेबुब पठाण, कार्यकारिणी सदस्य किशोर व्हटकर, दिगंबर पांचाळ, मनोज हावळे आदींनी तात्काळ इतरांना आवाहन करत पुढाकार घेतला.
 
Top