काटी , दि .२७

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील आडत व्यापारी  दत्ता सौदागर चवळे वय (50) यांचे रविवार दि. 25 रोजी पहाटे साडेतीन वाजनेच्या सुमारास सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दु:खद  निधन झाले. त्यांच्यावर जवळपास एक महिनाभर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काटी येथील आडत व्यापारी साजिद इनामदार यांचे मागील पंच्चेवीस वर्षांपासूनचे अतिशय विश्वासू व यशस्वी बिझनेस पार्टनर होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी तीन वाजता येथील चवळे मळ्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली जाण्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

         
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, एक मुलगा, तीन जावाई असा परिवार आहे.
 
Top