तुळजापूर, दि . २७ :
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे अत्यंत समर्थपणे चालवत आहेत. महाराष्ट्रातील सरकार चालवत असताना त्यांनी खंबीरपणे सर्वांना सोबत घेऊन वाटचाल चालविली आहे असे उदगार शिवसेनेच्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख सौ शामल पवार यांनी काढले .
ना. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेनेच्यावतीने सावरगाव ता . तुळजापूर येथे जिवन आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले . तर मधुकरराव चव्हाण विद्यालय केमवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्यामल वडणे, माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, शहर प्रमुख सुधीर कदम, उपतालुका प्रमुख प्रदीप मगर, गटप्रमुख धर्मराज काशीद शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
या निमित्ताने जिल्हाप्रमुख सौ. श्यामल पवार यांनी अत्यंत धिराने आणि धायरी आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जडणघडण करीत आहेत. तीन पक्षाचे आघाडी सरकार त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चित लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी उपतालुका प्रमुख प्रदीप मगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री झालेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम शिवसैनिकांच्या वतीने उस्फूर्तपणे केले जात आहेत असे सांगितले.