प्रतिकात्मक


इटकळ दि.२७ :

येवती ता.तुळजापूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील दोघांनी अत्याचर केला.पिडीतेच्या कुटुंबास जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली.ही घटना दि.२६ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास घडली.

तुळजापूर  तालुक्यातील येवती येथील अल्पवयीन मुलगी सायंकाळी साडे सातच्या सुमारास मैत्रीणीचे पुस्तक देण्यासाठी गेली होती. परत येत असताना अनुराग ढोले, व प्रशांत पालवे यांनी दुचाकी वरुन तोंड दाबून गावातील शाळेतील भात शिजविण्याच्या  खोलीत नेवुन दोघांनी अत्याचर केला.

याबाबत पिडीतेच्या कुटुंबातील आई -  वडील  विचारणा करण्यासाठी गेले आसता सिद्राम पालवे, अविनाश पालवे, प्रशांत पालवे, व सावित्री पालवे ह्यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण  केली.

याबाबत पिडीत मुलीच्या आईने नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पाचजणावर पोक्सो कायदा व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील चौघाना  पोलीसांनी ताब्यात घेतलेआहे.

याप्रकरणी  पुढील आधिक तपास पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे हे करीत आहेत.
 
Top