परंडा दि .२० :
पोलीस , पञकार , डॉक्टर , आरोग्य व सफाई कामगार यानी कोरोना काळात पुढे येऊन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची दखल घेवुन जमीयत उलमा ए हिंद यांच्यावतीने कोरोनायोद्धा म्हणुन गौरव करण्यात आला. यावेळी प्रशस्ती पत्र व गुलाबाचे रोपटे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .
कोरोना योद्धा म्हणुन पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे , सहाय्यक पोलिस निरीक्षक मोमीन , जगताप , बनसोडे , डॉ . अबरार पठाण .डॉ . निलोफर पठाण , डॉ . शिंदे यांच्यासह पोलीस , आरोग्य कर्मचारी, परंडा तालुकयातील पत्रकार, नगरपालिकेचे सफाई कामगार यांचा सन्मान जमीयत अलमा ए हिंदचे तालुकाध्यक्ष मौलाना जफर काझी , हफीजोद्दीन करपुडे , नगरध्यक्ष जाकीर सौदागर , मुर्तुजा पठाण , इरफान , शेख , गफार शेख , फारूक शेख , आधार सामाजिक सस्थेचे अध्यक्ष जुल्फेकार काझी , बाशा शाहबर्फीवाले , रियाज सिकलकर, राजु शेख , अॕड जफर जिनेरी , नुसरत करपुडे , हफीज सकलैन सौदागर , साबेर पल्ला , हाजी राजु डोंगरे , नासेर शेख यांच्या हस्ते पार पडला .
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत मौलाना जफर काझी यांनी करून कोरोना संकटात काम केलेल्या कोरोना योद्धांच्या कार्याचा गौरव केला . मौलाना जफर म्हणाले जमीयत उलेमा ए हिंद ही संघटना देश स्वातंत्र्यापुर्वीची आहे .आजही संघटनेचे कार्य सुरू आहे. हि संघटना गोरगरीबांच्या मदतीसाठी धावुन जाते संघटना मोडीत काढण्यासाठी अनेकांनी पर्यत्न केले. मात्र संघटनेचे आजही जोमाने कार्य सुरू आहे . संघटना सर्व समाजाचा गोरगरीब लोकांसाठी काम करीत आहे .
परंडा शहरात बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन
परंडा तालुक्यातील मुस्लीम बांधवानी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत बकरी ईद साधेपणाने साजरी करावी असे आहवान पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी या प्रसंगी केले .
सध्या कोरोनाचे संकट टळलेले नाही, याची दक्षता घेऊन मुस्लीम बांधवानी बकरी ईदची नमाज घरीच पठण करुन शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आहवान पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी या कार्यक्रमात केले.
परंडा : फारुक शेख