तुळजापूर दि . ५ 



भ्रष्टाचार निर्मुलन समिती राष्ट्रीय उपप्रदेश अध्यक्ष  शांताराम खुडे तुळजापूर येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोरोना रुग्णांच्या अडचणी तसेच उपचार करत असताना त्यांना देण्यात आलेल्या रेमडीसिवर इंजेक्शनची नोंद घेऊन त्याबाबतची राज्य सरकारकडे त्यासंदर्भात तक्रार करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

उपप्रदेश अध्यक्ष शांताराम खुडे  यांनी तुळजापूर येथील समिती तुळजापूर येथे शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन येथील समस्या आणि कार्यपद्धती याबाबत चर्चा केली. यावेळी विजय भोसले, धीरज जाधव , मंथन रांजणकर , निलेश कापसे , दीपक पलंगे ' संकेत शिंदे यांची उपस्थिती होती.  संघटना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी प्रश्न विचारून संवाद साधला.  कोरोना रुग्णांना देण्यात आलेल्या रेमडीसीवर इंजेक्शनचा झालेला वापर याची माहिती घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या

 
Top