नळदुर्ग , दि .११ : सुहास येडगे

 पुष्य नक्षत्रात शुक्रवार दि .  ९ जुलै रोजी नळदुर्ग परिसरात  झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील बोरी नदीला  आलेल्या पाण्याने ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षणीय असे पाणी महालाचा मादी धबधबा ओसंडून वाहू लागला आहे,  पुष्य नक्षत्रात पाणी महालाचा धबधबा चालू होण्याची ही पहिलीच वेळ आहे, दरम्यान शिल्लक धबधबा चालू झाल्याने या किल्ल्याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत.

नळदुर्ग व परिसरात शुक्रवारी रात्री ८ ते ११ वाजे पर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली, सुमारे दोन ते अडीच तास मुसळधार पाऊस झाल्याने शहरालगत वाहणाऱ्या बोरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले, बोरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील आलेल्या पाण्याने बोरी नदीचे पात्र पूर्ण क्षमतेने भरले आसल्याने ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षणीय असे पाणी महालाचे दोन धबधब्यापैकी मादी हा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. हा धबधबा शनिवारी सकाळी चालू झाला असून आता नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला पर्यटकांना खुणावतो आहे, 


सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  किल्ल्यात पर्यटकांना येण्यास बंदी आहे, मात्र किल्ल्याच्या बाहेरून पाणी महालाचा ओसंडून वाहणारा मादी धबधबा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे, त्यातच शिल्लक धबधबा ही ओसंडून वाहत आहे, त्यामुळे धबधब्याचे नयन मनोहर चित्र डोळ्यात टिपण्यासाठी पर्यटकांना एक पर्यटनाची मेजवानी  ठरणार आहे, 

सध्या हा किल्ला राज्य सरकारने पुरातन वास्तू व स्मारके जातं व संगोपन योजने अंतर्गत सोलापूर येथील युनिटी मल्टी काँन कंपनीस चालविण्यास देण्यात आले आहे, दरम्यान ही कंपनीही कोणत्याही क्षणी पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी तयार झाली आहे, आता किल्ल्यातील प्रेक्षणीय पाणी महालाचे दोन पैकी एक मादी धबधबा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.
 
Top