जळकोट, दि. ५ :
राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग व कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांच्या कल्पनेतून व सरपंच अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे बांधकाम कामगार व घरेलू कामगार यांची विशेष नोंदणी मोहिमेअंतर्गत नोंदणी करण्यात येऊन लाभार्थ्यांना कार्डचे वितरण करण्यात आले.
दि.५ जुलै रोजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांनी कामगार व घरेलू कामगार यांची जळकोट गावातच नोंदणी होण्यासाठी एक दिवसीय नोंदणी मोहीम राबवली. सरपंच आशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत कार्यालय यांनी यासाठी पुढाकार घेतला. व ही मोहीम यशस्वीरीत्या राबवली. अभूतपूर्व यश नोंदणी मोहिमेला मिळाले. राज्यमंत्री कडू यांच्या वाढदिवसादिवशी त्यांना अभिष्टचिंतन करून नोंदणी मोहिमेला शुभारंभ करण्यात आला.
लाभार्थ्यांना यावेळी कार्डचे वितरण करण्यात आले. जळकोट गावातील विठ्ठल सुतार यांना मोहिमेला पहिला मान मिळाला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते कार्डचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहायक सातलिंग स्वामी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सहचिटणीस महेश कदम, तालुका शिवसेनेचे उपप्रमुख कृष्णात मोरे, उपसरपंचपती बसवराज कवठे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, ग्रामपंचायत सदस्य जीवन कुंभार, प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मोहिते, जिल्हा सचिव महादेव चोपदार ,जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हा सचिव बाळासाहेब पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष महादेव खंडाळकर, तालुका सचिव अनिल महाबोले, मुकेश स्वामी, महेश माळी, सचिन बिद्री, विजय जाधव, पिंटू चुंगे, बसवराज भोगे, पिंटू कागे, विजय स्वामी, प्रभाकर कदम, विजय यादगौडा, श्रीशैल दरेकर, जिल्हा कामगार कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी, कामगार व घरेलू कामगार, ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष मेघराज किलजे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य अंकुश लोखंडे यांनी मानले.