उस्मानाबाद , दि . १८ 

पोलीस ठाणे, लोहारा : तुकाराम दंडगुले, रा. तावशीगड, ता. लोहारा हे दि. 17 जुलै रोजी तावशीगड शिवारात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्यासह रोख रक्कम बाळगलेले असलेले लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळळे.

पोलीस ठाणे, तुळजापूर : धर्मा जाधव, रा. तुळजापूर हे दि. 17 जुलै रोजी तुळजापूरातील घाटशिल रोड येथील वाहन स्थळाजवळ मिलन नाईट मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,520 ₹ रोख रक्कम बाळगलेले असलेले तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळळे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.) : जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. 17 जुलै रोजी उस्मानाबाद शहरातील जुना बस डेपो परिसरात छापा मारला. यावेळी रजनिकांत पवार, दयानंद सिरसाठे, आकाश चव्हाण, मुर्शद शेख, इम्राण शेख, शंकर काळे, कालु काळे हे सात जण तिरट जुगार साहित्य व 6,650 ₹ रोख रक्कम बाळगलेले पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे म.जु.का. अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top