उस्मानाबाद दि. १३

जिल्हा: काल सोमवार दि. 12.07.2021 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या छाप्यांत आढळलेली 326 लि. गावठी दारु, देशी- विदेशी दारुच्या 133 बाटल्या (एकत्रीत किंमत 30,240₹) जप्त करुन संबंधीत पोलीस ठाण्यात 38 व्यक्तींविरुध्द 38 गुन्हे महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत नोंदवले आहेत.

पो.ठा. भुम: शंभु टिळक, रा. पाथ्रुड हे गावातील एका हॉटेलमागे देशी दारुच्या 11 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. दुसऱ्या छाप्यात सिंधुबाई काळे, रा. चिंचोली या गावातील बस थांब्याजवळ एका कॅनमध्ये 9 लि. गावठी दारु  बाळगलेल्या आढळल्या. तीसऱ्या छाप्यात लंकाबाई शिंदे, रा. वाकवड या आपल्या राहत्या घरासमोर 9 लि. गावठी दारु  बाळगलेल्या आढळल्या. चौथ्या छाप्यात हनुमंत रणखांबे, रा. पाटसांगवी हे गावातील आपल्या पत्रा शेडसमोर देशी दारुच्या 9 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले पथकास आढळले.

पो.ठा. वाशी: दत्तात्रय साबळे, रा. लांजेश्वर हे गावातील एका हॉटेलजवळ देशी दारुच्या 7 बाटल्या  अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. दुसऱ्या छाप्यात आशाबाई शिंदे, रा. खैराट वस्ती, वाशी या आपल्या राहत्या घरासमोर 30 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या. तीसऱ्या छाप्यात दादा गायकवाड, रा. घाटपिंपरी हे आपल्या राहत्या घराजवळ देशी दारुच्या 7 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. चौथ्या छाप्यात ताई पवार, रा. पारगाव या आपल्या राहत्या घराजवळ 8 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या. पाचव्या छाप्यात कांताबाई शिंदे, रा. चिरकाड वस्ती, पारा या आपल्या घरासमोर 8 लि. गावठी दारु बाळगलेल्या पथकास आढळल्या.

पो.ठा. कळंब: संगीता पवार व सुभाष शिंदे, दोघे रा. वाकडी (के.), ता. कळंब हे गावशिवारात वेगवेगळ्या दोन ठिकाणी एकत्रीत 20 लि. गावठी दारु  बाळगलेले आढळले. तीसऱ्या व चौथ्या छाप्यात किरण पवार व तानाबाई पवार, दोघे रा. कळंब हे दोघे आपापत्या राहत्या परिसरात प्रत्येकी 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. पाचव्या छाप्यात नेहा पवार, रा. पारधी वस्ती, कळंब या राहत्या परिसरात 18 लि. गावठी दारु बाळगलेल्या पथकास आढळल्या.

पो.ठा. उमरगा: संजय सुर्यवंशी व गोपीचंद पवार, दोघे रा. डिग्गी हे दोघे आपापल्या राहत्या घरासमोर अनुक्रमे 10 लि. व 12 ‍लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. तीसऱ्या छाप्यात संतोष करनुरे, रा. कसगीवाडी हे आपल्या शेतात 15 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. चौथ्या छाप्यात विजय कांबळे, रा. एकुरगा हे आपल्या राहत्या घरासमोर 16 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. पाचव्या छाप्यात लहु मकाळे, रा. नाईचाकुर हे आपल्या घरासमोर 10 लि. गावठी दारु बाळगलेले पथकास आढळले.

पो.ठा. मुरुम: हरी वाघमारे, रा. आनंदनगर, मुरुम हे आपल्या राहत्या कॉलनीत 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. दुसऱ्या छाप्यात अमित राठोड, रा. वेळंब तांडा हे आपल्या वस्तीवर 8 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. तीसऱ्या छाप्यात दत्तात्रय लाळे, रा. कोराळ हे गाव शेत‍ शिवारात देशी दारुच्या 12 बाटल्या अवेध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले पथकास आढळले.

पो.ठा. ढोकी: रुपाबाई शिंदे व सिताबाई काळे, दोघी रा. तडवळा (क.) या दोघी गावातील वेगवेगळ्या दोन ठिकाणी अनुक्रमे 13 लि. व 20 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या. तीसऱ्या घटनेत लिलाबाई शिंदे, रा. दत्तनगर पारधी पिढी, ढोकी या राहत्या वस्तीवर 15 लि. गावठी दारु बाळगलेल्या पथकास आढळल्या.

पो.ठा. बेंबळी: जिजाबाई केदार, रा. पाटोदा या गावातील पत्रा शेडजवळ देशी दारुच्या 15 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या आढळल्या. दुसऱ्या घटनेत किशोर घोडके, रा. रुईभर हे गाव शिवारात देशी दारुच्या 10 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले पथकास आढळले.

पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.): विजय सरवदे, रा. वरवंटी हे आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत 20 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. दुसऱ्या घटनेत सोनाली पवार, रा. आळणी या गडदेवधरी येथील शिंगोली रस्त्यालगत 10 लि. गावठी दारु बाळगलेल्या पथकास आढळल्या.

पो.ठा. आनंदनगर: विजय पवार, रा. तांबरी विभाग हे शाहुनगर लगतच्या शेतात 5 लि. गावठी दारु व सिंधु काळे, रा. काकानगर या आपल्या राहत्या परिसरात 6 लि. गावठी दारु बाळगलेल्या पथकास आढळल्या.

पो.ठा. तुळजापूर: हिरामन भोसले, रा. डिकसळ पिढी, ता. तुळजापूर हे मोर्डा- धारुर रस्त्यालगत देशी दारुच्या 15 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले पथकास आढळले.

पो.ठा. तामलवाडी: सौरभ गहाणे, रा. माळी गल्ली, काटी हे आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. गावठी दारु बाळगलेले पथकास आढळले.

पो.ठा. आंबी: तानाजी डुकळे, रा. मलकापुर, ता. परंडा हे आपल्या घरामागे देशी दारुच्या 14 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले पथकास आढळले.

पो.ठा. शिराढोन: केसरबाई पवार, रा. लोहटा (पुर्व) या आपल्या घरासमोर 5 लि. गावठी दारु बाळगलेल्या पथकास आढळल्या.

पो.ठा. नळदुर्ग: सखुबाई कांबळे, रा. व्होर्टी या आपल्या घरासमोर 4 लि. गावठी दारु बाळगलेल्या पथकास आढळल्या.

पो.ठा. परंडा: बाळु गोडगे, रा. राजुरी, ता. परंडा हे जवळा येथील एका चायनिज सेंटरच्या बाजूस देशी- विदेशी दारुच्या 33 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले पथकास आढळले.

 
Top