तुळजापूर , दि . ३० : 
 
पश्चिम महाराष्ट्रातील चिपळूणच्या पूरग्रस्त कुटुंबियांना जमियते उलेमा ए हिंदच्यावतीने जिवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली असुन यासाठी उस्मानाबाद जमियते उलेमा ए हिंद  यांनी पुढाकार घेतला. 


महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांना अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ आदीचा समावेश आहे. 

दि. ३० जुलै रोजी तुळजापूर जमियते उलेमा ए हिंद शाखेच्या वतीने शहरातील विविध नागरिकांद्वारे मदत स्वरूपात पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू गहू , तांदूळ , तेल डाळ तसेच चादर आदी  मदत स्वरूपात पाठवण्यात आली आहे.


 शहरातील मुस्लिम बांधवांनी जो माणुसकीचा विचार करून पूरग्रस्त भागातील लोकांना जी मदत केली ती खरोखरच खुप कौतुकास्पद आहे,  असे नगराध्यक्ष सचिन रोचकरी बोलताना म्हणाले . 

यावेळी जमियते उलेमा ए हिंद तालुका अध्यक्ष मौलाना बशीर, शहर अध्यक्ष मौलाना मुक्ती फिरदोस पठाण, सेक्रेटरी मौलाना हाफिज इब्राहिम, नगराध्यक्ष सचिन रोचकरी ' पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद गोकुळ  शिंदे , सज्जन साळुंखे , आनंद कंदले अविनाश गंगणे,  रणजित इंगळे , बबन गावडे , युसूफ शेख,  मकसुद शेख , फेरोज पठाण , आरिफ बागवान , तोफिक शेख ,  मोसीन बागवानसह नागरिक उपस्थित होते.
 
Top