उस्मानाबाद , दि . १८ : 

तूळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे दिलपाक प्रतिष्ठानच्या वतीने  नालंदा बुुध्द विहार,राजर्षी शाहू महाराज चौक , आंबेडकर नगर या ठिकाणी  लोकशाहीर  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनी  अभिवादन करण्यात आले . 
कार्यक्रमाच्या प्रारंभी विहारातील तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले .   साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन बळीराम भगत , तात्यासाहेब पारधे ज्ञानेश्वर दिलपाक यांच्या उपस्थितीत सामुदायिक बुध्दवंदना घेऊन झाले.
यावेळी ज्ञानेश्वर दिलपाक, बळी भगत यांनी  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विविधांगी पैलू आपल्या भाषणातून मांडले.


याप्रसंगी   दिलपाक प्रतिष्ठानचे जेष्ठ सदस्य मधुकर दिलपाक ,संकेत दिलपाक, सचिन दिलपाक  तसेच लहान मुले मुली दिशा भगत , निशा भगत , अर्पिता पारधे , प्रणिता पारधे ,दीक्षा दिलपाक, समीक्षा दिलपाक इ . मंडळी यांची उपस्थिती होती
 
Top