नळदुर्ग , दि .२२ : सुहास येडगे


नळदुर्ग येथील सुमारे सहा वर्षापासून रखडत पडलेल्या उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधून तयार झाली असून आता या इमारतीमध्ये लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याच्या मागणीसाठी नळदुर्ग शहर काँग्रेस कमेटी, व महीला काँग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ नळदुर्गचे उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याच्या दृष्टीने उपाय योजना संबंधीत विभगाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेवून कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. 


शहर महीला काँग्रेस व काँग्रेस कमेटीच्या वतीने नळदुर्गचे उपजिल्हा रुग्णालय तात्काळ चालू करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना एक लेखी निवेदन देण्यात आले असून या निवेदनात असे म्हटले आहे की, नळदुर्ग येथे सन २०१४ मध्ये शासनाकडून उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मात्र आदयाप पर्यंत हे रुग्णालय चालू करण्यात आले नाही. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे रुग्णालय कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी चालू करण्याच्या हालचाली झाल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेवून त्या ठिकाणी कशाची कमतरता आहे, ती कमतरता तात्काळ दुर करुन तीन हॉल कोरोना उपचार केंद्र म्हणून चालू करण्यासाठी प्रयत्न केला होता. त्या नुसार संबंधीत ठेकेदाराने तीन हॉल सर्व सोयीनी युक्त असे बांधून तयार केले होते. त्याच बरोबर या ठिकाणी जिल्हा शल्यचिकीत्सक श्री पाटील यांनी ही भेट देवून तात्काळ या ठिकाणी हे रुग्णालय चालू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले होते. परंतु त्या नंतर पुढे काय झाले माहीत नाही. पण रुग्णालय चालू झाले नाही. सध्या पुन्हा कोरोना, डेंग्यू व साथीच्या आजाराने सर्वत्र धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे नळदुर्ग शहर व परिसरातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा मिळण्यासाठी हे उपजिल्हा रुग्णालय सुरु करणे गरजेचे झाले आहे.


 सध्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे हे उपजिल्हा रुग्णलय सुरु करण्यास कोणतीही आडचण राहणार नाही. दरम्यान या उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या जागा ही भरल्या आहेत, त्यांना शासनाकडून पगार ही चालू आहे पंरतु या ठिकाणी हे अधिकारी आजून ही आले नाहीत, या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ज्या ठिकाणी नेमणूक दिली आहे त्या ठिकाणी त्यांना सेवा देणे बंधनकारक आसताना आजून ही या रुग्णालयात संबंधीत अधिकारी व कर्मचारी येवू शकत नाहीत. याला प्रशासनच जबाबदार आहे. त्याच बरोबर वारंवार आरोग्य मंत्र्यासह इतर नेते मंडळी व अधिकारी यांना निवेदन देवून ही केवळ आश्वासनाशिवाय दुसरे कांही मिळाले नाही. त्यामुळे सध्याची गंभीर परिस्थीती  लक्षात घेवून हे उपजिल्हा रुग्णालय तात्काळ सुरु करावे अन्यथा मंगळवार दि. २४ ऑगष्ट २०२१ रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारती समोर नळदुर्ग शहर काँग्रेसच्या वतीने सर्व महिला व पुरुष कार्यकर्ते यांच्याकडून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आसल्याचा इशारा ही यावेळी या निवेदनात देण्यात आला आहे. 


या निवेदनावर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नवाज काझी, शहर महीला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा सौ. कल्पनाताई गायकवाड, तालुका महीला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा सौ. सुभद्राताई बलभीम मुळे, नगरसेवक शहेबाज काझी, बसवराज धरणे, मन्नाबी कुरेशी, विनायक अहंकारी, माजी नगरसेवक इमाम शेख, शरीफ शेख, सुधीर हजारे, सचिन डुकरे, अजहर जहागिरदार, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, माजी नगरध्यक्षा सौ. झिमाताई राठोड, सौ. मंगलताई सुरवसे, श्रीमती शाहेदाबी सय्यद, श्रीमती अनिताताई रणे यांच्यासह बहूसंख्य कार्यकर्ते यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top