काटी , दि . २२ उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी, केमवाडी, वडगाव (काटी), गंजेवाडी येथे रविवार दि. (22) रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव संपर्क अभियान राबविण्यात आले असून त्याअनुषंगाने "गाव तिथे शाखा" व घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना हाती घेत शाखांचे उद्घघाटन तर काटी येथे येथील मुख्य बाजार चौकात शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्धघाटन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नागरी सुविधा अंतर्गत पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण संपन्न झाले.
यावेळी शिवसैनिक व नागरिकांना संबोधित करताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, गावातील कोणत्याही समस्येबाबत पक्षाचे हे संपर्क कार्यालय सदैव तत्पर राहणार असून आपले प्रश्न सोडवण्याला माझा आणि पक्ष कार्यालयाचा सदैव अग्रक्रम असणार असल्याचे आश्वासन देत तालुक्याचा अतिशय जिव्हाळ्याचा व सातत्याने प्रलंबित असणाऱ्या उस्मानाबाद- तुळजापूर -सोलापुर रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मी आणि माझे सहकारी आमदार कैलास पाटील सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत असून येत्या काही वर्षांमध्ये आपला तुळजापूर तालुका हा रेल्वेने जोडला जाईल असाही शब्द यावेळी स्थानिकांना दिला. कधीही न पाहिलेली अतिवृष्टी तुळजापूर तालुक्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पाठीमागे अनुभवली एवढ्या मोठ्या अतिवृष्टीे मधून हा तालुका खुप झपाट्याने पूर्वपदावर येऊन स्थिरावला आणि सावरला आहे परंतु काही भागातील प्रलंबित असणारा विम्याच्या प्रश्नावर जोपर्यंत नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर त्याची नुकसान भरपाई जमा होत नाही तोपर्यंत सतत केंद्र सरकार कडे या प्रश्नांबाबत सातत्याने प्रश्न व जवाब विचारत राहीन असे स्थानिकांना सांगितले. इतर पक्षांच्या संपर्क कार्यालयांपेक्षा आपल्या पक्षाचे संपर्क कार्यालय कसे समाजाभिमुख काम करत राहील आणि संपर्क कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा आपल्या पक्षाच्या कामावरील विश्वास वाढून आशावाद कसा निर्माण करता येईल याचे भान ठेऊन संपर्क कार्यालय चालवावे असेही यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना सुचित केले. तसेच कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, तुळजापूर तालुका शिवसेना प्रमुख जगन्नाथ गवळी, माजी उपजिल्हा प्रमुख शाम पवार, तालुका उपप्रमुख प्रदीप मगर, युवा सेनेचे प्रतिक रोचकरी, विभागप्रमुख तुळशीदास बोबडे, गणप्रमुख समाधान गुरव, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, रामदास देवकर, तुळशीदास बोबडे,अशोक जाधव, शिवा साळुंके,खंडू गवळी,राजेंद्र ढगे, खुंटेवाडीतील मोहन जाधव, संतोष जाधव, रवी जाधव,संजय जाधव, अण्णा लांडगे,महादेव जाधव, कुलदीप जाधव, सागर इंगळे, समाधान जाधव,रोहन जाधव, किसन आचारष दत्ता आचार, सुहास भोसले, सुरेश आचार, भैरवनाथ कदम, किसन जाधव, यांच्यासह व ग्रामस्थ, शिवसैनिक उपस्थित होते.