नळदुर्ग , दि .२२ दादासाहेब बनसोडे
रेशनकार्ड संदर्भातील शिबिरात नागरिकांचा उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला असुन रविवार रोजी चारशे पेक्षा आधिक अर्ज दाखल झाले आहे. शिधापत्रिकेसाठी तहसिलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार संदीप जाधव यांच्या उपस्थितीत समस्येचा निपटारा करण्यात आला.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे रविवार दि. 22 रोजी सकाळी दहा ते चार या कालावधीत रेशनकार्ड संदर्भातील समस्येवर येथील जिल्हा परिषद प्रशाला नळदुर्ग येथिल शाळेत घेण्यात आलेल्या शिबिरात नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. नागरीकाची प्रारंभी तुळजापूरचे तहसिलदार सौदागर तांदळे नायब तहसीलदार संदीप जाधव, शिवसेना जिल्हा उपप्रमुख कमलाकर चव्हाण नगर सेवक शहबाज काझी अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे मंडल अधिकारी अमर गांधले सरदारसिंग ठाकुर शहर प्रमुख संतोष पुदाले मंडल अधिकारी शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थित शिबिरास प्रारंभ करण्यात आला.
दिशा समितीचे अध्यक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सुचनेनुसार महसूलच्या पुरवठा विभागाच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसीलदार संदीप जाधव यांच्या उपस्थितीत मंडळा अंतर्गत येणाऱ्या नळदुर्ग आणी परिसरातील नागरीकानी जिल्हा परिषद प्रशाला प्रांरगणात तोबा गर्दी केली होती.
शहर व परिसरातील नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या रेशनकार्ड संदर्भातील शिबिरात नागरिकांच्या समस्येचा निपटारा तहसिलदार सौदागर तांदळे नायब तहसीलदार संदीप जाधव यानी नागरीकांशी संवाद साधुन केला . या शिबिरात अनेकदा रेशनकार्ड संदर्भात रेशनकार्ड अपडेट करण्याबरोबरच विविध समस्यांमुळे नागरिकांना प्रशासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात. कागदपत्रांची पूर्तता नसल्याने व अपुरी माहितीमुळे अनेक कुटुंबाचे रेशनकार्ड दुरुस्त होत नाही. तालुका स्तरावर या याबाबत अर्ज प्रलंबित राहत असल्याने दिशा समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने जिल्हाभर रेशनकार्ड संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नळदुर्ग व परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार मंडळातील सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांच्या रेशनकार्ड संदर्भातील अडचणी जाणून घेऊन त्या रेशनकार्ड शिबिरामार्फत सोडविण्यात आल्या. या शिबिरात नायब तहसीलदार संदीप जाधव यांनी रेशनकार्ड संदर्भात माहिती देऊन प्रत्येक ग्रामस्थाला रेशनकार्ड संदर्भातील आपली समस्या मांडण्याची संधी यावेळी देण्यात आली.तसेच उर्वरित समस्येबाबत सहकार्याचे आश्वासन देऊन नागरिकांनी स्वतः तहसिल कार्यालयाकडे पाठपुरावा करावा असे आवाहन करण्यात आले.
या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समस्या मांडल्या. या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, महात्मा फुले जिवनदायी प्रमाणपत्र देणे, दुय्यम शिधापत्रिका देणे, मदत कक्ष असे स्वतंत्र टेबल मांडण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या शिबिरात फाटलेले रेशनकार्ड नवीन करणे, पत्ता बदल करणे, हरवलेले रेशनकार्ड नवीन करणे, रेशनकार्ड विभक्त करणे, रेशनकार्ड मध्ये नाव वाढविणे, कमी करणे, महात्मा फुले जिवनदायी योजना प्रमाणपत्र देणे, दुय्यम शिधापत्रिका मागणीच्या संदर्भात शिधापत्रिका धारकांनी पुरवठा विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज दाखल झाले.नाव कमी करण्यासाठी अर्ज, दुय्यम शिधापत्रिका मागणी अर्ज महात्मा फुले जिवनदायी योजनेसाठी अर्ज दाखल झाले आहेत.
तहसीलदार सौदागर तांदळे, पुरवठा निरिक्षक तथा नायब तहसीलदार संदीप जाधव, मंडळ अधिकारी अमर गांधले तलाठी टि. डी. कदम, अव्वल कारकून एस जी.पवार, महसूल सहाय्यक पी.जी. कानडे, औदुंबर गिरी, सुरेश वाघमारे, बाळु सोनवणे, अंकुश जाधव, सर्व परिसरातील रेशन दुकनदार यानी पुढाकार घेतले .