काटी , दि .२२
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मुख्य बाजार चौकातील रस्त्याच्या कामासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव देशमुख यांनी खासदार ओमराजे  निंबाळकर यांचेकडे पाठपुरावा करुन 5 लक्ष रुपयेचा निधी मंजूर करुन आणला होता. रविवार दि. 22 रोजी दुपारी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जनसुविधा योजनेअंतर्गत 5 लक्ष रुपयेच्या रस्ता कॉक्रिटीकरण या कामाचे लोकार्पण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.


 यावेळी आमदार कैलास घाडगे पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव प्रतापराव देशमुख, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, सोसायटीचे माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सुहास साळुंके, रामेश्वर लाडुळकर,राजेंद्र गाटे,नाबाजी ढगे,सचिन इंगळे, जुबेर शेख,आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
 
Top