लोहगाव, दि .२२

तुळजापूर तहसील कार्यालयाच्या वतीने सूरू करण्यात आलेल्या 
शिधापञिकेबाबतचे शिबिर 
मंगळवार  दि.24 व बुधवार दि.25 रोजी तुळजापूर तालुक्यातील जळकोट  येथे पार पडणार आहे,
यामध्ये शिधापञिका धारकांच्या शिधापञिका बदलून देणे, विभक्त शिधापञिका देणे, शिधापञिकेतील नाव कमी करणे, समाविष्ट करणे, आदि कामासाठी मंडळनिहाय शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे, तरी जळकोट, लोहगाव, नंदगाव,जळकोटवाडी, हंगरगा (नळ) बोरगाव, इंदिरानगर, सिंदगाव, सलगरा
 (मड्डी),शाहपूर, गुजनूर ,दहिटणा,
गुळहळ्ळी, बोळेगाव या गावासह मंडळ अंतर्गत येणा-या लोकांनी या शिबिराचा  लाभ घ्यावा असे आवाहन लोहगाव ग्रामपंचायतचे सदस्य निजाम शेख यांनी केले आहे.
 
Top