तुळजापूर , दि .२८ : 

एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुळजापूर नगर परिषदेवर पुन्हा लाल बावटा फडकविण्याच्या तयारीला पदाधिकार्‍यांनी सुरूवात केली आहे. 

शनिवार  दि.28 झालेल्या बैठकीत आगामी नगर परिषद निवडणूक स्बळावर लढण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाने घेतला. त्यामुळे सत्ताधारी गटामोर शेतकरी कामगार पक्षाचे कडवे आव्हान यावेळेसही राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत आगामी नगर परिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. सर्वांची मते जाणून घेऊन स्बळावर ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यावेळी माजी नगराध्यक्ष भाई प्रकाश देशमुख, खलील शेख, उत्तम अमृतराव, मारूती नाईकवाडी यांनी पक्ष बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीसंदर्भात मार्गदर्शन केले. 

बैठकीस शेकापचे तालुका सरचिटणीस किरण खपले, सहचिटणीस सुधीर जमादार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य उत्तम अमृतराव, राजू माने, शहर चिटणीस किरण घाटशिळे, सुभाष छत्रे, प्रताप ताकमोघे, यल्लाप्पा बनपट्टे, सीताराम शिंगे, अभिलाष बेळंबे, उमेश भिसे, राहुल खपले, बापूसाहेब भोसले, शिवनाथ भांजी, नवनाथ जगताप, भालचंद्र अपराध, युवराज पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top