इटकळ , दि . २८ 

 इटकळ ता तुळजापूर येथे तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या वतीने शिधापत्रिका शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार  दि.२८ रोजी शिबिरासाठी  तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार संदीप जाधव,  यांच्यासह सरपंच राजश्री बागडे, उपसरपंच फिरोज मुजावर, माजी सरपंच अरविंद पाटील, माजी सरपंच विजयकुमार गायकवाड, काशिनाथ लकडे ,सायबा क्षिरसागर, अमोल पाटील ,विनोद सलगरे, नजीर शेख,यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी इटकळ सज्जाच्या अंतर्गत असलेल्या गावातील लोकांच्या जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, विभक्त शिधापत्रिका देणे ,शिधापत्रिकेतील नाव कमी करणे ,शिधा पत्रिके मध्ये नाव समाविष्ट करणे, नवीन शिधापत्रिका देणे याबाबत इटकळ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात तहसिलदार सौदागर तांदळे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

 दि .२८ व २९ ऑगस्ट रोजी इटकळ  सज्जातील इटकळ, खानापूर, टेलरनगर, काटगाव,  घटेवाडी, चव्हाणवाडी, धोत्री ,खडकी ,शिवाजीनगर, केशेगाव, शिरगापुर ,बाभळगाव, केरुर ,येवती ,काळेगाव, हिप्परगा, आरबळी, दिंडेगाव ,निलेगाव, देवसिंगा (नळ ) या गावातील शेकडो शिधापत्रिका धारकांनी याचा लाभ घेतला.

यावेळी गावोगावचे तलाठी,सज्जाचे मंडळाधिकारी, राशन दुकानदार, शिधापत्रिका लाभधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 
Top