नळदुर्ग , दि . २८ सुहास येडगे : 

पत्रकारांच्या सहकार्यामुळे काम करणे सोपे झाले असल्याचे नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कैलास लहाने यांनी म्हटले आहे. पदोन्नतीनंतर श्री कैलास लहाने यांची पुणे येथे बदली झाली आहे. पदोन्नतीनंतर कैलास लहाने हे आता सहाय्यक पोलिस निरीक्षक झाले आहेत. 


यानिमित्त नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासुन श्री कैलास लहाने हे नळदुर्ग पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणुन कार्यरत होते. त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करुन आपल्या कार्याची चुणुक दाखविली आहे. नळदुर्ग येथे असताना श्री लहाने यांना दोन पदक तसेच दोन पुरस्कार मिळाले आहेत. जनमानसात मिसळुन काम करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करण्याबरोबरच सामाजिक कार्यातही श्री कैलास लहाने हे नेहमी अग्रेसर असतात. पोलिस उपनिरीक्षक कैलास लहाने यांची पदोन्नती होऊन त्यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणुन पुणे येथे बदली झाली आहे. 


यानिमित्त नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा दि.२८ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते  लहाने यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पोलिस उपनिरीक्षक मुसा शहा, जीविशाचे  पोतदार, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार लतिफ शेख, शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे, आयुब शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे, रघुनाथ नागणे, आदीजन उपस्थित होते. 

यावेळी सत्काराला उत्तर देताना सपोनि कैलास लहाने यांनी म्हटले की, पत्रकार आणि पोलिस यांच्यामध्ये समन्वय चांगला असला की काम करण्यात कुठली अडचण येत नाही. पत्रकारांनी नेहमीच सहकार्य केले आहे. नळदुर्ग शहरांतील सर्व क्षेत्रातील नागरीकांनी आम्हाला प्रत्येक कामात सहकार्य केले त्यामुळे मला चांगले काम करता आले असे सपोनि लहाने यांनी म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार दादासाहेब बनसोडे यांनी मानले.
 
Top