अणदूर , दि . २९ :
मल्हार मार्तंड श्री खंडेरायाची श्रावणी रविवार पूजा अणदूरचे (ता . तुळजापूर ) पुजारी,सेवेकरी नंदकुमार ढेपे व महालदार शुभम मोकाशे यांनी आजची पूजा केली. संपूर्ण श्रावण महिन्यात खंडोबा ट्रस्टने शासनाचे सर्व नियम पाळून श्री ची धार्मिक विधी पूर्ण केली आहे.
नंदकुमार ढेपे आजचे सेवेकरी पुजारी यांनी स्वखर्चाने आजची पूजा केली असून कोरोना नियमा मुळे,भक्ता विना देवाची ही परीक्षा या काळात होत आहे, देवाचे नित्य पूजा पुजारी मंडळी करीत आहेत. ऐन श्रावणात सलग दुसऱ्या वर्षी ही पूजा होत आहे, श्रावण महिन्यात अणदूर खंडोबाला विविध पोशाखाने सजवण्यात येते. तसेच राम राजू मोकाशे व शाम नीलकंठ मोकाशे यांच्या वतीने पहाटे ओल्या कपड्यात कावड घेऊन मैलापूर जवळील नागझरी मधून पाणी आणून देवाची पूजा पूर्ण श्रावण महिनाभर आणून त्याच पाण्याने पूजा केली जाते. ती प्रथा आजही सुरू असून कोरोना काळात मंदिर बंद असताना सुद्धा ही प्रथा परंपरा आजही चालू असून भक्त भाविक फक्त मुख्य दरवाजाचे दर्शन घेऊन समाधान पावत आहेत.
या अशा भीषण संकटात मंदिरे सरकारने खुली करावीत जेणेकरून भक्त आपल्या देवाला भेटतील व हे संकट पळून जाईल अशी भावना सामान्य भक्तांनी व्यक्त केली आहे
"लग्न,कार्य झाल्यावर आपल्या कुलदैवताला येण्याची प्रथा ,परंपरा असून, आंध्र, कर्नाटक, व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून भक्त भाविक आपले नवस फेडण्यासाठी येत असतात, त्यांना दरवाजाचे दर्शन घेऊन माघारी जावे लागते, नाविलाज आहे शासनाच्या नियम अटींचे पालन करून भक्ता ना ,भावनिक आव्हान केले जाते व सहकार्याची अपेक्षा करून सर्व धार्मिक विधी केले जातात.
श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट अणदूर