उस्मानाबाद , दि . २७ :
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर , अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती आवळे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत भूम तालुक्यातील चार अनधिकृत स्टोन क्रशरवर कारवाई करत ते सील करण्यात आले.
याबाबत पंचनामा करण्यात आला असून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाईत उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, तहसीलदार श्रीमती शृंगारे , नायब तहसीलदार सावंत , राठोड, पाटील तसेच मंडळ अधिकारी स्वामी, पाटील, हाके, तलाठी थोरात, केदार, पाटील तसेच पोलीस ठाणे भूम येथील पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
प्रत्यक्ष ठिकाणी ६०० ब्रास हून अधिक बारीक खडी , कच विनापरवाना साठवल्याचे आढळून आला आहे . तसेच यापूर्वी मोठ्या प्रमाणावर टेकडी फोडून उत्खनन केल्याचे दिसून आले. त्याची इ टी (ets मोजणी करून त्याबाबत कारवाई केली जात आहे. या कारवाईत पोलिस विभागाचेही सहकार्य मिळाले आहे .