नंदकुमार पोतदार,सुप्रिया कावरे (बडोदकर) टीमनी साकारली रांगोळी
तुळजापूर ,दि .२७ :
तुळजापूर येथील प्राचीन श्री मुदगलेश्वर महादेव शिवलिंग मंदिरात शहरातील भक्तांच्या माध्यमातून विविध रूपात आकर्षक अशी सजावट कायमस्वरूपी केल्याचे आपण पाहतो, नाविन्यपूर्ण देखावा मांडणी असो किंवा फळा फुलांची आरास असो शिवभक्तांना यातून विविध रुपात शिवलिंगाचे नयनरम्य दर्शन घडवली जाते.
तुळजापूर घाट पायथ्याशी असलेल्या सिंदफळ गाव शिवारातील श्री मुदगलेश्वर महादेव शिवलिंग मंदिरात श्रावण महिन्यात दैनंदिन विविध रूपात सजावट करून भाविकांना सोशल माध्यमातून दर्शन दिले जात आहे, कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद असल्यामुळे श्री मुदगलेश्वर मंदिर हे भाविक भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले आहे परंतु पुजारी बांधव आणि मंदिरात आकर्षक पद्धतीने सजावट करणाऱ्या टीमच्या माध्यमातून सातत्याने मंदिर व मंदिर परिसराचे नयनरम्य सजावट आपणास पहावयास मिळते आहे.
श्रावण महिन्यातील सोमवारी किंवा इतरही दिवशी सजावटी विशेष असतात तुळजापूर शहरातील आर्ट कलावंत नंदकुमार पोद्दार व सुप्रिया बडोदकर टीम नी श्रावणमास निमित्त श्री. मुद्गलेश्वर महादेव मंदिरामध्ये अमरनाथ बाबा अवतार महापूजा सचित्र पोर्ट्रेट रांगोळी रेखाटन करून आपले कौशल्य चित्रणसेवा अर्पण केली आहे.
ही पोर्ट्रेट कलाकृती रांगोळीद्वारे सुंदर रेखाटल्यामुळे भक्तांमधून कौतुक व्यक्त केले जात आहे, या टीममधील नंदकुमार पोद्दार व कु. सुप्रिया बडोदकर,सहाय्यक कलावंत कु.नेहा कावरे (बडोदकर),कु. हर्षदा कावरे ( बडोदकर),कु.श्रावणी शिंदे कु.गार्गी कावरे,श्रावणी चव्हाण,कांचन इंगळे,सई लोंढे, साक्षी आदिंनी परिश्रम घेतले आहे.