काटी , दि .०४
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील अजय बालक पानपुडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीच्या बळावर दहावी नंतर उस्मानाबाद येथील वि.जे.शिंदे तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेऊन पंढरपूर येथे स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये इलेक्ट्रीक इंजिनिअर ही पदवी संपादन केली.
स्पर्धेच्या युगात सुरुवातीपासून अजय पानपुडे हे इंडियन नेव्हीत नौकरीचे स्वप्न बाळगत होते. जगातील बहुसंख्य व्यापार हा सागरी मार्गाने होत असल्याने व मर्चंट नेव्ही हे व्यवसायिक क्षेत्र असल्याने त्यांना यामध्ये रुची होती व ते यामध्ये नौकरीसाठी प्रयत्नशील होते. जिद्दीच्या जोरावर अखेर त्यांची मेक्सिकोत सागरी जलवाहतूक मर्चंट नेव्ही मध्ये इलेक्ट्रीकल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या निवडीबद्दल तामलवाडी येथील भास्कर स्पर्धा परीक्षा वाचनालयाच्या वतीने भास्कर स्पर्धा परीक्षा वाचनालयात अजय पानपुडे यांचा तुळजापूर पंचायत समितीचे नुतन उपसभापती दत्तात्रय शिंदे, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
दत्तात्रय शिंदे उपसभापती पंचायत समिती , तुळजापूर
सध्या स्पर्धेचे युग असून स्पर्धात्मक परिक्षेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून उज्वल यश संपादन करण्यासाठी तामलवाडीसह परिसरातील विद्यार्थ्यांनी तामलवाडी येथील भास्कर स्पर्धा परीक्षा वाचनालयाचा लाभ घ्यावा व या वाचनालयात एमपीएससी, युपीएससी, पोलीस भरती आदी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक पुस्तके या वाचनालयात अध्ययनासाठी ठेवण्यात आले असून स्पर्धात्मक युगात हे वाचनालय म्हणजे उर्जेचे
स्त्रोत असल्याचे प्रतिपादन करुन तामलवाडी परिसरातील विद्यार्थ्यांनी या वाचनालयाचा लाभ घ्यावा व यापुढे विद्यार्थ्यांनी अजय पानपुडे यांची प्रेरणा घेऊन यश संपादन करावे
यावेळी पंचायत समितेचे दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित, डॉ.रविकांत गुरव, पो.कॉ. आकाश सुरनर, हरी पाटील, रवी घोंघणे, विभुते, शरद म्हेत्रे, बिलाल बेगडे, अन्वर शेख, सुमित मसुते, सुजित अवताडे, वैभव शिंदे, शुभम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.