तुळजापूर दि .४

शहरातील मंगळवार पेठ भागात तहसील कार्यालय परिसरात रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनावर कारवाई करण्याची धडक मोहीम नगरपरिषदेच्या वतीने सकाळी राबविण्यात आली. यामध्ये सात वाहनावर कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

तुळजापूर नगर परिषदेचे वतीने सकाळी 11 वाजता तहसील कार्यालया समोर प्रशासकीय कामासाठी आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी वाहनावर कारवाई करण्यात आली. यादरम्यान नगरपरिषदेने दोन ठिकाणी वाहनतळ नव्याने निर्माण केले आहे. हे वाहनतळ सदर वाहनचालकांना माहीत नसल्यामुळे त्यांनी इतर प्रसंगा प्रमाणे बुधवारी सकाळी आपली वाहने रस्त्यावर दुतर्फा उभी केली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणे तसेच कोरोना संसर्ग नियमांची पायमल्ली होत असल्याच्या कारणाने नगरपरिषदेने सदर वाहनचालकांना ताब्यात घेतले. अनेकांना समज देऊन तेथून दूर केले.


वाहने रस्त्यावर उभी करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे. मात्र नगर परिषदेकडून जुना सरकारी दवाखाना आणि जुने पोलीस निरीक्षक निवासस्थान या मोक्याच्या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ निर्माण केले आहे. तेथे दुचाकी व चार चाकी वाहन चालकांनी आपली वाहने पार्किंग करावेत अशी सूचना नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी करण्यात आलेल्या कारवाईनंतर दिवसभर रस्त्यावर वाहने उभी करण्यात आली नाहीत. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले.  


दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली .त्यांना पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले, त्यानंतर पोलिसांनी कोणती कारवाई केली हे समजू शकले नाही.
 
Top