परंडा, दि. 04 : फारुक शेख


 दुध दरवाढ व खरीप पिक विमा शेतक-याना  त्वरीत मिळावा अन्यथ दि . 16 ऑगस्ट रोजी परंडा तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने परंडा तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे  दिले आहे. 



आधीच कोरोना  या महामारीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल दराने विकला जात असून दुधाच्या दरातही कमालीची घसरण झाली आहे . गेल्या सहा महिन्यापासून 20 ते 22 रुपये या दराने दूध विकले जात  असून शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे  अवघड झाले आहे . त्यामध्ये जनावराच्या खाद्याच्या किमती 200 ते 300 रुपयांनी वाढले आहेत. तर दुधाचे दर हे तीस रुपये वरून वीस ते बावीस रुपये आले आहेत. दुधाच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून केवळ शेतकऱ्यांना जनावरासाठी खुराक घेता येईल. तेवढाच पैसा हाती पडत असून शेतकऱ्यांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे . यामधून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासनाने दुधाला प्रति लिटर 35 रुपये दर द्यावा तसेच 2020 - 2 1 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरला अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पिक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी व  विमा कंपनीने घातलेल्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात . अशा मागणीचे निवेदन दि . ४ रोजी तहसीलदार परंडा मार्फत जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिले असून दि . 15 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास दि. 16 ऑगस्ट रोजी परंडा तहसील कार्यालयासमोर परंडा - बार्शी रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


 निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर घोगरे , शहराध्यक्ष सादत आली काझी, युवाअध्यक्ष शिवाजी ठवरे ,विशाल पाटील ,श्रीराम पाटील, दादासाहेब पाटोळे ,राजेंद्र गरड इत्यादींच्या स्वाक्षर्‍या आहेत,
 
Top