काटी , दि .२१ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कट्टर शिवसैनिक तथा सध्या भिवंडीतील कोंडाजीवाडी कचेरीपाडा येथे वास्तव्यास असलेले आकाश विलास देवकर यांना शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशान्वये भिवंडीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार भिवंडी शहरप्रमुख सुभाष माने यांच्या हस्ते कोंडाजीवाडी कचेरीपाडा, भिवंडी शाखाप्रमुखपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या या निवडीचे शिवसैनिकांमधून स्वागत होत आहे.
यावेळी त्यांचे सहकारी सुभाष माने (शहर प्रमुख ),राकेश मोरे (उपशहर प्रमुख ), भागोजी कारके ( विभाग प्रमुख), संतोष ताकदऊंदे, दत्ता कारंडे, मौला शेख ( उप शाखा प्रमुख ), सैपन शेख, शफिक मुजावर,विठ्ठल खैरे, भरत गोणते, आकाश ताकदऊंदे,भरत चुदासामा, अमोल गीत्ते, तुषार तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.