वागदरी , दि .२१ एस.के.गायकवाड


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक थोर समाजसेवक, विचारवंत साहित्यिक ,समाज परिवर्तनवादी चळवळीतील एक संयमी नेतृत्व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या आठव्या स्मृती दिना निमित्ताने त्यांना नळदुर्ग  येथे विविध समविचारी पक्ष संस्था व संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.


  नळदुर्ग बसस्थानकासमोरील संविधान चौकात आभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आभिवादनपर श्रध्दांजली वहाताना परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव मारूती बनसोडे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपले जिवन आर्पित केले असून आठ वर्षा पूर्वी त्यांची धर्मांध्य नराधमानी हत्या केली ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना असून अध्याप त्यांच्या खऱ्या मारेकऱ्यांचा तपास लागत नाही ही निषेधार्थ बाब आहे.

   यावेळी रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाइं युवाआघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशिक्षक आर.एस.गायकवाड, शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ कानडे, दिपकभाऊ निकाळजे सामाजिक संस्थेचे उमेश गायकवाड,सुर्यकांत सुरवसे, पिंटु लोंढे, सामाजिक कार्यकर्ते आण्णाराव सोनकांबळे, रमेश लोखंडे, सह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top