उस्मानाबाद, दि .२० :
राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त येथील उस्मानाबाद जिल्हा परिषदेत सद्भभावना दिवसाची शपथ घेण्यात आली.
सद्भभावना दिनानिमित्त देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्मिता कांबळे यांनी करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सदभावना दिवसाची शपथ घेण्यात आली.
यावेळी अस्मिता कांबळे म्हणाल्या,आपण सद्भावना दिनानिमित्ताने शपथ येत आहोत,त्याला अनुसरून संवैधानिक मार्गाने विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करूयात हीच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. चिमनशेटे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी श्रीमती रत्नमाला गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.