तुळजापूर दि 20
राज्य निवडणूक आयोगाकडून डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत नगरपरिषदेचा कार्यकाल पूर्ण होत असल्याने पालिकेच्या निवडणुका वेळेत होण्याच्या अनुषंगाने २३ ऑगस्ट पासून या कामाला सुरुवात करावी अशा सूचना उप आयुक्त राज्य निवडणूक आयोग अविनाश सणस यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने सुधार परिपत्रकानुसार निवडणुका वेळेत घेण्याच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत सदरील कामकाज गोपनीय राहील याची खबरदारी घेण्याचे महत्त्वाची निर्देश यामध्ये समाविष्ट आहेत.२०११ वर्षातील लोकसंख्या लक्षात घेऊन नगरपरिषदेची सदस्यसंख्या निश्चित करावी आणि त्यानुसार प्रभाग रचना करण्यात यावी ही प्रभागरचना बहु सदस्य नसून प्रत्येक प्रवाह प्रभागांमध्ये एक नगरसेवक यानुसार नवीन रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नगरपरिषदेची मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक असल्यामुळे सदरील कामकाजाला विलंब होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी २३ ऑगस्ट पासून या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या आहेत, या सर्व प्रभाग रचना आणि सदस्य संख्या यांचा कच्चा आराखडा तातडीने तयार करून तो निवडणूक आयोगाकडे देण्यासंबंधी व प्रभाग रचनेमध्ये हद्दवाढ झालेल्या भागाचा , शहरात नव्याने करण्यात आलेल्या विकास कामामुळे झालेले बदल याची नोंद करून आराखडा बनविण्यात यावा, निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या तयार करणे निवडणूक संचालन व नियंत्रण करणे त्याचबरोबर प्रभाग रचना करून सदस्य संख्या निश्चित करणे यासाठी नगरपरिषद प्रशासनाला राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या या परिपत्रकामुळे नगरपरिषदेच्या निवडणुका केव्हा होणार या संदर्भात असणारी संदिग्धता दूर झाली आहे वेळ संपण्यापूर्वी निवडणुका होणार राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यामुळे डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये निवडणुका होतील असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.