उस्मानाबाद , दि .०३


 अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील नागरिकांना जीवनाश्यक वस्तु आणि मदत निधी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पोहचविण्यासाठी तरूणाई सरसावली आहे. तुळजापूर तालुक्यातील ग्रामिण भागातील युवक वर्गाने सोशल मिडियाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जागी ठेवून पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तुंचे किट उस्मानाबाद  येथील सामाजिक संस्थेकडे सुपूर्द केले.

तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी , किलज, होर्टी, सावरगाव, वडगाव देव यासह तुळजापूर शहरातील तरुणांच्या समुहाने सोशल मिडियावरून पूरग्रस्तांना मदत देण्याचे आवाहन केले होते. 

 समाजातील दानशूरांनी या तरुणांना सहकार्य केले. याशिवाय या तरुणांच्या पॉकिट मनीतील कांही भाग यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचे औदार्य दाखविले.

या मदतीच्या माध्यातून पूरग्रस्तांसाठी एकूण ७० किराणा किट देण्यात आले. यामध्ये गणेश तानवडे, ऋषीकेश घोडके, विशाल केदार, आकाश लंगडे, प्रतिक भोसले, कुणाल लोमटे, मनोज देवकते, अविनाश कुंभार, राम जळकोटे, प्रसाद राजमाने, अविष्कार फस्के, वैभव मर्डे,प्रकाश बंडे, विशाल पाटील, सारंग जोशी इत्यादी युवकांनी एकत्रित येत हे सामाजिक कार्य पार पाडले.
 
Top